शहरात भांडणावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल


स्थैर्य, फलटण : येथील उमाजी नाईक चौक येथे राहणाऱ्या तेजस मदने याने गणेश जालगर, संजय जालगर दोघे राहणार मेटकरी गल्ली, फलटण यांच्या विरुद्ध अय्यास शेख, सर्पराज शेख, गणेश जालगर, संजय जालगर यांचेत भांडणे चालू असताना फिर्यादी तेजस मदने यांचे वडील शाहू मदने भांडणे सोडवित असताना फिर्यादी बोलवण्याकरिता गेले असताना गणेश जालगर याने हातातील लोखंडी गजाने डोक्यात मारून शिवीगाळ करून मारहाण केली व संजय जालगर याने लाथा बुक्यांनी मारहाण केली म्हणून वगैरेची तक्रार खबरी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिकारी भोईटे करीत आहेत.

मेटकरी गल्ली, फलटण येथे राहणाऱ्या गणेश परशुराम जालगर याने सर्पराज इजाज शेख, अय्यास इजाज शेख, शाहुजी बंडू मदने, तेजस शाहुजी मदने, राहुल जाधव, आकाश चौधरी, जोतीराम क्षीरसागर यांच्या विरिध काल झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांना व फिर्यादीच्या भावास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून वगैरेची मजकूर असलेली तक्रार खबरी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुख्य काँस्टेबल वीरकर करीत आहेत.

सदरील दोन्ही गुन्ह्यांची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिलेली आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.