बोंबाळेच्या वीस वर्षीय गर्भवती महिलेस कोरोना


बोंबाळे (भाग्य नगर) : येथे परिसर सील करताना अधिकारी (छाया : समीर तांबोळी)


स्थैर्य, कातरखटाव, दि. १० : भाग्यनगर ( बोंबाळे ता खटाव) येथील  वीस वर्षीय गर्भवती महिलेचा  कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने  परीसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाच्या नवीन धोरणानुसार साठ वर्षावरील सर्व  व्यक्ती व गर्भवती महिला यांची कोरोना तपासणी सुरु आहे.त्यानुसार  गत सप्ताहात संबंधित  महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली होती.या  महिलेस कोणत्याही प्रकारचा खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसून आलेली नाहीत. गर्भवती असल्याने वेळच्यावेळी सर्व तपासण्या सुरु होत्या. वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटाव व वडूज येथिल खासगी दवाखान्यात या महिलेची तपासणी सुरु होती. कोणतीही लक्षणे नसताना या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह कसा  आला ? अशी  चर्चा सुरु आहे.  या महिलेस उपचारासाठी सातारा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून संपरकातील  इतर तीन नातलगांना मायणी च्या  विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदीसह अधिकाऱ्यांनी  गावास भेट देत  परिसर सील केला आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.