कोळकीत पुन्हा करोना पॉसिटीव्ह रुग्ण


स्थैर्य, कोळकी : मूळचे आंदरुड ता. फलटण येथील मात्र सध्या कोळकी येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय पुरुषाचा कोव्हीड १९ म्हणजेच करोनाचा अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे. ह्या रुग्णास सारी या आजाराची लागण झालेली होतीच व सदरील रुग्ण हा मुंबई येथून प्रवास करून आला होता, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

काल रोजी 2688 व्यक्ती होम क्वारंटाईन केलेल्या आहेत. त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील करोना केअर सेंटरमधील कन्फर्म वार्ड मध्ये 7 रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 113 जण आहेत. असेही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post