मुंबईत आता प्रिस्क्रिप्शनशिवायही होणार कोरोनाची चाचणी
स्थैर्य, मुंबई, दि. ०८ : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखीत सल्ल्याशिवाय म्हणजे प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोरोना चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे आता मुंबईतील निर्धारित खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये थेटपणे संपर्क साधून कोव्हिड चाचणी करता येणार आहे. ही चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या विभागस्तरीय 'वॉर रुम'द्वारे बेड अलॉटमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होईल.

मुंबई महापालिका क्षेत्रात 17 खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.