राज्यातल्या नाट्यवितरकांचा नवा संघ स्थापन - अध्यक्षपदी जयप्रकाश जातेगांवकर
महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक व्यवस्थापक संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश जातेगांवकर 
नव्या निर्माता संघाच्या हालचालीनंतर प्रथमच महाराष्ट्रातले नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबई बाहेरचे वितरक व व्यवस्थापक एकवटले. नव्या संघाची स्थापना. कोरोना काळात आलेल्या अडचणीमुळे एकत्रित येण्यावर भर. कार्यकारिणी जाहीर.

स्थैर्य, सातारा, दि. १९ : महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगांव ह्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्रम वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्यसमितीची निवड करण्यात आली.

पूर्ण वेळ नाटक वितरण आणि व्यवस्थापनाशी संबंधित असलेले ५४ सदस्य या संघाशी संलग्न आहेत. काल पर्यंत असंघटित असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील वितरक आणि व्यवस्थापक या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेत. राज्य सरकारने करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वात आधी राज्यभरातील नाट्यगृहं बंद केलीत आणि येणाऱ्या दिवसांत परिस्थिती निवळल्यानंतर पूर्वस्थितीवर येतांना नाट्यगृहं सुरू करण्यास सर्वात शेवटी प्राधान्य देण्यात येईल. तेंव्हा ज्या लोकांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे नाटक आणि नाट्यगृहांवर अवलंबून आहे त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल ह्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर करोना नंतर एकदा नाट्यगृहं सुरू झाली की प्रेक्षकांच्या सुरक्षेतेस प्राधान्य देत काय बदल करावे लागतील ह्यावरही चर्चा करण्यात आली. नाट्यगृह प्रशासनाचे सहकार्य घेत पुढचे नियोजन करण्यात येणार आहे. नवीन तंत्रजञानाचा उपयोग करत रसिकांसाठी कुठलाही अधिभार न लावता ऑनलाईन तिकीट विक्रीची व्यवस्था, वाढत्या खर्चाच्या पाश्र्वभूमीवर योग्य आणि अचूक नियोजन करत कार्यक्रम आयोजित करण्याचा स्थानिक खर्च आवाक्यात ठेवत तिकीट दरात वाढ न करता दर्जेदार कार्यक्रमांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक केंद्रित झालेली नाट्यसृष्टी महाराष्टातील इतर जिल्ह्यातही पोहचावी या साठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या सर्वच संघटनेशी योग्य सवांद साधत मराठी नाटकांच्या आणखी प्रचार आणि प्रसार करणे ह्यालाही प्राथमिकता देण्यात येणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या ह्या बैठकीत संघटनेचे स्थापना आध्यक्ष म्हणून जयप्रकाश जातेगांवकर तसेच कार्याध्यक्षपदी गिरीश महाजन कोल्हापुर, उपाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी, पुणे, समीर पंडित, नागपुर, प्रमुख कार्यवाहपदी आनंद कुलकर्णी, कोल्हापुर, सहकार्यवाह- प्रवीण बर्वे, पुणे, संदीप सोनार औरंगाबाद आणि खजिनदार समीर हंपी, पुणे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड झालेल्या संपूर्ण कार्यकारी सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत -
 
अध्यक्ष-  जयप्रकाश जातेगावकर, नाशिक
कार्याध्यक्ष- गिरीश महाजन, कोल्हापूर
उपाध्यक्ष-  मोहन कुलकर्णी, पुणे
उपाध्यक्ष-  समीर पंडित, नागपुर
प्रमुख कार्यवाह- आनंद कुलकर्णी, कोल्हापूर
सहकार्यवाह- प्रवीण बर्वे, पुणे
सहकार्यवाह- संदीप सोनार, औरंगाबाद
खजिनदार- समीर हंपी, पुणे

कार्यकारी समिती सदस्य 
धनंजय गाडगीळ, सांगली
विजय कुबडे, राजापूर
राकेश नेमळेकर, कुडाळ
गुरु वठारे, सोलापूर
राजेंद्र जाधव, नाशिक
आबा ढोले, परभणी
रघुवीर देशमुख, अमरावती

निमंत्रीत सदस्य 
दादा साळुंखे, सोलापूर
योगेश कुष्टे, चिपळून
राजू परदेशी, औरंगाबाद
किशोर सावंत, रत्नागिरी
लक्ष्मण उपारे,सोलापूर
अनंत जांगळे, बेळगांव
Previous Post Next Post