फलटण तालुक्यातील झिरपवाडीत बिबट्याच्या अफवेने भीतीचे वातावरण; तो बिबट्या नसून तरस असण्याची श्यक्यता : वन विभाग


स्थैर्य, फलटण : गेल्या दोन दिवसात फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावात बिबट्या आल्याच्या अफवेने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. परंतु झिरपवाडी गावात बिबट्या नसून तरस होता असे वन विभागाने स्पष्ट केले. त्या मुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या दोन दिवसात झिरपवाडी गावात हिसंक प्राण्याने पाळीव जनावरांवर हल्ला केला होता, त्या वेळी झिरपवाडी गावात बिबट्या आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर वन विभागाने तेथे पाहणी केली असता तो बिबट्या नसून तरस असण्याची श्यक्यता वर्तवली आहे. 
Previous Post Next Post