सातारा जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिह्यात प्रवेश करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

 


स्थैर्य, सातारा, दि. ३० : सातारा जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिह्यात प्रवेश करणाया तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी 8.28 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र अण्णासो भोसले (वय 42), सुरेश शिवाजी ढाणे (वय 39), महेंद्र अर्जुन पवार (वय38) सर्व रा. मूळ पाडळी, ता. सातारा सध्या रा. लोणावळा, ता. मावळ,.जि. पुणे या तिघांनी मावळ ते पाडळी असा कोणत्या तरी वाहनाने प्रवास करत सातारा जिल्हय़ात प्रवेश केला.

जिल्हाधिकारी यांचा संचारबंदीचा व जिल्हा बंदीचा आदेश असतानाही त्या आदेशाचा भंग करून सातारा जिह्यात प्रवेश केला. तसेच संयुक्तिक कारण नसतानाही कोणतेही परवानगीची कागदपत्रे जवळ न बाळगता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya