.... अखेर नाना पाटील चौकातील कॅनॉलच्या त्या पुलाचे काम सुरु


स्थैर्य, कोळकी : फलटण येथील नाना पाटील चौक आणि ट्राफिक जाम हे नेहमीचेच झालेले आहे. जर नाना पाटील चौकात गेलो आणि ट्राफिक जाम नसेल तर फलटणकरांना पण आपण खूप नशीबवान आहोत असे वाटते. सध्या लॉकडाउनच्या काळात नाना पाटील चौका शेजारून जाणाऱ्या नीरा उजवा कॅनॉलच्या विस्तारित पुलाचे काम सुरु झालेले आहे. सदरचा पूल चालू झाल्यावर ट्राफिक जाम होणार नाही असे बहुतांश जणांचे मत आहे. गत काही महिन्यांपूर्वी फलटण नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती त्या वेळी नाना पाटील चौकातील त्या पुलासमोरील सर्व अतिक्रमणे काढली होती. त्या मुळे आता नक्कीच त्या पुलाच्या कमला गती मिळाली आहे. आगामी काळात नक्कीच या पुलाचा फायदा फलटणकरांना ट्राफिक जाम पासून वाचण्यासाठी होईल. 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya