फलटण तालुक्यातून ५९ रुग्ण कोरोना मुक्त तर ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू : प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता शंभरच्या पुढे गेलेली आहे. तर देशात एका दिवसात कोरोनाचे 25 हजार रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एका दिवसातील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. फलटण तालुक्यामध्ये एकूण कोरोना रुग्ण १०८ असून त्यातील ५९ रुग्ण हे कोरोना मुक्त झालेले आहेत. फलटण तालुक्यामध्ये कोरोना मुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून सद्य स्थितीला ऍक्टिव्ह रुग्ण ४१ आहेत, अशी माहिती फलटणचे प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली.

या वेळी बोलताना प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील म्हणाले कि, काल (दिनांक ९ जुलै) रोजी 2785 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये 27 रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 57 जण आहेत. या सोबतच काल २० जणांच्या चाचण्या घेतल्या सून काल २ रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह आलेले आहेत. फलटण तालुक्यामध्ये अजून एकूण ६० कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.
Previous Post Next Post