शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा : दशरथ फुले

 

स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पूर्णतः ठप्प झाले असून या महामंडळाना निधी केंद्र तसेच राज्य शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त दशरथ फुले यांनी केली आहे.

देशभर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शासनाला लॉकडाउन करावे लागले याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवहारावर झाला असून अनेकांना आपल्या नोकऱ्यावर पाणी सोडवे लागले आहे. त्या मुळे अनेकांनवर उपासमाची वेळ आली आहे. या करोनाच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या लॉकडाउन मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय अडचणीत आले आहेत, अशांना भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्या साठी शासनाने या महामंडळा मार्फत मागासवर्गी घटकातीत विविध जाती जमातीतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असेही फुले यांनी स्पष्ट केले आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.