जावलीत अंतर्गत रस्त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष


स्थैर्य, फलटण :  जावली ता. फलटण गावातील महादेव मंदिर ते समाज मंदिर दरम्यान सुमारे अर्धा किलोमीटर असणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गेलेले आहे. त्या मुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून जावली ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थ यांना त्रास सहन करावा लागत आहे, तरी ग्रामपंचायतीने त्वरित रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जावली, ता. फलटण येथील गावातील अंतर्गत रस्त्यावरुन जाताना महिला विद्यार्थी तरूण व लोकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. जावली ग्रामपंचायत प्रशाशन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक वर्षी या रस्त्यावर मुरमीकरण केले जाते. मात्र यावरून दरवषी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात असल्याने वारंवार रस्त्याची दुरावस्था होत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालून या रस्त्याची डागडुजी करून वारंवार होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Previous Post Next Post