स्व. हणमंतराव पवार हायस्कूल फलटणचा एसएससी परीक्षेचा निकाल 96.77%


स्थैर्य, फलटण : येथील सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे सहकारमहर्षी स्व. हणमंतराव पवार हायस्कूल फलटणचा एसएससी परीक्षेचा निकाल 96.77% लागलेला आहे. स्व. हणमंतराव पवार हायस्कूल मध्ये निकिता बनकर 95.80% प्रथम क्रमांक, स्नेहल गायकवाड 95.60% व्दितीय क्रमांक, संपदा खोपडे 95.20% तृतीय क्रमांक पटकावला आहे. २० विद्यार्थांना विशेष प्राविण्य प्राप्त झाले आहे तर प्रथम श्रेणी २४ विद्यार्थांना मिळाले आहे. 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव सौ. मधुबाला भोसले, प्राचार्य राजेंद्र रेपाळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post