सातारा शहर व तालुका करोनाचा हॉट स्पॉट
स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने तालुका हॉट स्पॉट बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. सातारा शहरात गेल्या दिवसभरात एकूण 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 3 असे 10 रुग्ण सापडले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्याची रुग्णसंख्या आता 410 झाली आहे तर कंटेंटमेंट झोन 118 आहेत. सातारा शहरात एकूण रुग्ण 98 झाले आहेत.

सध्या सातारा शहरात एकूण 7 रुग्ण सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाधित झाले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार विमल सिटी येथील 25 वर्षीय पुरुष तर 47 आणि 67 वर्षीय महिला बाधित आढळली. तसेच बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला बाधित आढळली आहे. तामजाईनगरात 30 व 45 वर्षीय पुरुष आढळून आले आहेत. यशवंत हॉस्पिटल येथे दाखल असलेली 39 वर्षीय महिला बाधित झाली आहेत. ही महिला माची पेठेतील असल्याने तेथे नव्याने कंटेंटमेंट झोन झाला आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्या 98 झाली आहे तर 19 कंटेनमेंट झोन झाले आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात करंदी येथे 20 वर्षीय पुरुष बाधित झाला आहे. शहापूर येथील 28 वर्षीय पुरुष तर नागठाणे येथील 23 वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागठाणे परिसरात बाधित रुग्ण आढळू लागल्याने याठिकाणी चिंतेचे सावट आहे. तालुक्यात आज दोन ठिकाणी कंटेंटमेंट झोन बनले आहेत.

जिहे गाव बनले हॉटस्पॉटएकट्या जिहे गावामध्ये एकूण 86 रुग्ण झाले आहेत. यामुळे हे गाव आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या गावातील मायक्रोकंटेंट झोन प्रशासनाने कडक केला असून गावात बाहेर पडणार्‍यावर कडक कारवाई होणार आहे. यासाठी प्रशासनाने गावावर आता ड्रोन कॅमर्‍याद्वारेही नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Previous Post Next Post