मायणीत तीन दिवसात सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
स्थैर्य, मायणी, दि. 30 : गेले महिनाभरापासून कोरोनातून मुक्त झालेली मायणी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. दोन दिवसांपूर्वी 45 वर्षीय पती व 35 वर्षीय पत्नी यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काल त्यांचाच 22 वर्षीय मुलगा व 19 वर्षीय मुलगी या दोघांचेही  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज सलग तिसर्‍या दिवशी मायणी येथीलच 39 वर्षीय व 31 वर्षीय दोन पुरुषांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मायणीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजअखेर मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील कोरोना सेंटरमध्ये एकूण 1021 व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यातील 151 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून यातील 128 जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. सध्या मायणी येथे 20 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फुलेनगर परिसरापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाचा आज तिसर्‍या दिवशी मायणीच्या गावाच्या भागात पसरण्यास सुरवात झाली असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलेनगरच्या परिसरातून जाणार रस्ता स्थानिक युवकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बाभळीचे झाड रस्त्यावर टाकून बंद केला आहे.

गेले महिनाभरापासून कोरोनातून मुक्त झालेली मायणी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. दोन दिवसांपूर्वी 45 वर्षीय पती व 35 वर्षीय पत्नी यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काल त्यांचाच 22 वर्षीय मुलगा व 19 वर्षीय मुलगी या दोघांचेही  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज सलग तिसर्‍या दिवशी मायणी येथीलच 39 वर्षीय व 31 वर्षीय दोन पुरुषांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मायणीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजअखेर मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील कोरोना सेंटरमध्ये एकूण 1021 व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यातील 151 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून यातील 128 जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. सध्या मायणी येथे 20 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फुलेनगर परिसरापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाचा आज तिसर्‍या दिवशी मायणीच्या गावाच्या भागात पसरण्यास सुरवात झाली असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलेनगरच्या परिसरातून जाणार रस्ता स्थानिक युवकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बाभळीचे झाड रस्त्यावर टाकून बंद केला आहे.
Previous Post Next Post