कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक घटली
स्थैर्य, फलटण दि. २७ : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या आवारातील रविवार दि. २६ जुलैच्या  साप्ताहिक भुसार बाजारात आवक घटली मात्र दर थोडा फार बदल वगळता स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे, गत सप्ताहातील बाजार बंद असल्याने यापूर्वी दि. १२ जुलै रोजी व त्यानंतर आज साप्ताहिक भुसार बाजार झाल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

आज रविवार दि. २६ च्या साप्ताहिक भुसार बाजारात ५७ क्विंटल ज्वारी आवक झाली, दर प्रति क्विंटल २१०० ते ३८०० रुपये, बाजरी आवक ६७ क्विंटल, दर प्रति क्विंटल १२०० ते १६०० रुपये, गहु आवक २१८ क्विंटल, दर प्रति क्विंटल १७०० ते २००० रुपये, हरभरा आवक ४२ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३४५० ते ४४७५ रुपये, मका आवक १३१ क्विंटल, दर प्रति क्विंटल ११०० ते १३४० रुपये, मूग आवक २ क्विंटल, दर प्रति क्विंटल ६००० रुपये, घेवडा आवक १६ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३२०० ते ४७०० रुपये, खपली आवक ८ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३५०० रुपये, चवळी आवक ३ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३५७६ ते ३७०० रुपये आणि तूर आवक १ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३५०० रुपये निघाल्याचे बाजार समिती सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
Previous Post Next Post