वाठार गावात अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट
संबंधिताकडुन टोलवाटोलवीची उत्तरे


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.२८ : उत्तर कोरेगाव तालुक्यामधील वाठार स्टे. या गावामध्ये ग्रामपंचायत माध्यमातुन दोरके दलित वस्तीमध्ये नुकतेच अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की वाठार स्टे.गाव ता. कोरेगाव या ठिकाणी दोरके दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत माध्यमातुन श्रीफळ वाढवुन शुंभारंभ केला होता. या कामाची ग्रामपंचायतीने दैनिकामधुन टेंडर मागविले होते त्यामध्ये  फक्त एकाच ठेकेदाराची निविदा आली होती त्यानुसार संबंधित ठेकेदाराने मंजुर कामाचा फलक लावने गरजेचे होते. या सिमेंट रस्त्यासाठी अंदाजे खर्च कोणत्या फंडातुन करण्यात येणार आहे? कामाचा कालावधी किती असणार? या कामासाठी खर्च किती झाला? अशा माहितीचा कसलाही फलक येथे लावण्यात आलेला नाही.

याबाबत ग्रामसेवकांना विचारले असता आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने टेंडर नोटीस प्रसिद्ध केली होती त्यानुसार एकच निविदा आली व त्यानुसार संबंधित ठेकेदारास काम देण्यात आले होते. या कामासाठी २.२० लाख इतका खर्च करण्यात आला आहे परंतु स्थानिक नागरिकांनी हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे असे  आरपीआय तालुकाध्यक्ष हेमंत दोरके, वाठार ग्रा. पं. सदस्य सुमित चव्हाण व भाजप कार्यकर्ते सचिन जाधव यांच्या निदर्शनास आणुन दिले असता जेव्हा या सर्वांनी संबंधितांना जाब विचारला असता टोलवाटोलवीचे उत्तरे दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

जेव्हा हेमंत दोरके, सुमित चव्हाण व सचिन जाधव व स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसेवकाला धारेवर धरुन प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्यांना या कामाबाबत व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत तर ठेकेदारानीही या कामाची माहिती फलकावर लावलेली नाही. सदरचा सिमेंट रस्ता हा अवघ्या १ महिन्यामध्ये खचला असुन रस्त्याचे मोजमाप हा कमी जास्त केल्याने रस्त्याचा बाजुला पाणी साठत असुन यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

गेल्या अनेक वर्षापासुन संबंधित एकाच ठेकेदारास वाठार ग्रामपंचायतीकडुन कामे दिली जात असल्याचा आरोप रिपाई तालुकाध्यक्ष हेमंत दोरके, ग्रा.पं.सदस्य सुमित चव्हाण व भाजप कार्यकर्ते सचिन जाधव यांनी केला असुन या कामाची व संबंधित ठेकेदाराची कसुन चौकशी करण्यात यावी व चौकशी होईपर्यंत संबंधित ठेकेदारास बील देण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडुन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडुन केली जात आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.