कराड नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कोरोना पॉझिटिव्ह
स्थैर्य, कराड, दि. २२ : कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मी ठणठणीत आहे, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगदग व धावपळ झाल्याने मागील दोन दिवसापासून थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहिल, असे त्यांनी म्हटले आहे.कराडकर जनतेने या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे लवकरच बरी होऊन पुन्हा आपल्या सेवेत येईल आपण स्वतःची काळजी घेऊन इतरांचीही काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. कुटुंबाची काळजी घ्यावी असे भावनिक आवाहन नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी केले.
Previous Post Next Post