कैलास स्माशानभूमी यांच्यावतीने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लाईव्ह अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा
स्थैर्य, सातारा, दि. २१ : संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी सातारा यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लाईव्ह अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांपासून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सातारा प्रशासनाने अंत्यसंस्कार आणि सावडणे विधीस येण्यासाठी वीस लोकांची मर्यादा घातली आहे . बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे काही अत्यंत जवळच्या लोकांना लाॅकडाऊनच्या काळात अंत्यसंस्काराला पोहचणे शक्य होत नाही आणि इतर वेळेस सुद्धा पर-जिल्ह्यातून आणि राज्यातुन तसेच परदेशातून येण्यास आपली जवळची व्यक्ती मृत झाल्यास अंत्यसंस्कारासाठी येणे आवश्यक असते पण येऊ शकत नाहीत अशाच लोकांसाठी लाइव्ह अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . जर अशी सुविधा पाहिजे असल्यास 9422603625 या नंबर वर दोन तास अगोदर संपर्क साधावा अशी विनंती राजेंद्र चोरगे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.