लोकमान्य टिळक : जीवन आणि कार्य
लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग


स्थैर्य, मुंबई, दि. २० : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आयोजित लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्य टिळक : जीवन आणि कार्य’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. १ ते ४ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण वर्गात लोकमान्यांचे भारतीय राजकारणातील योगदान, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक, लोकमान्यांचे गीतारहस्य, लोकमान्य आणि प्राच्यविद्या संशोधन, लोकमान्य टिळकांचे अर्थकारण, लोकमान्य टिळकांच्या आठवणी, कायदेपंडित लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळकांनी योजलेले सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम या विषयांवर ज्येष्ठ व अनुभवी वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या  चार दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गात रोज दोन सत्र होतील.

आपणास विनंती आहे की या प्रशिक्षण वर्गाच्या वृत्ताला आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी द्यावी, व हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.

या प्रशिक्षण वर्गात १८ वर्षावरील कोणीही इच्छुक व्यक्ती सहभागी होऊ शकतात.

नाव नोंदणीसाठी संपर्क : दिलीप नवेले ९९६७४२९४५६, अनिल पांचाळ ९९७५४१५९२२, उत्तम पवार ८१०८०२४६०९, शैलेश गोखले ८१०८९५५९६६, देवेंद्र पै ९००४३९६९५५, मिलिंद बेटावदकर ९८३३५०९२२२
Previous Post Next Post