लग्नकार्यात किंवा मंगल कार्यात सनई चौघडे व बँड वाजवण्यास महाराष्ट्र शाशनाने परवानगी द्यावी; अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघाची मागणी


स्थैर्य, फलटण : लग्नकार्यात किंवा मंगल कार्यात सनई चौघडे व बँड वाजवण्यास महाराष्ट्र शाशनाने परवानगी द्यावी. त्या सोबतच देवस्थान ठिकाणी देवाची सेवा करत असणाऱ्या घडशी समाजातील बांधवाना शासनाने आर्थिक मदत करावी. घडशी समाजाची जात निहाय स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. ज्या घडशी बांधवांच्या देवस्थानाच्या जमिनी कुळ कायद्याद्वारे गेलेल्या आहेत, त्या शाशनाने पुन्हा घडशी बांधवाना द्याव्यात. अश्या विविध मागण्यांचे निवेदन फलटणचे नायब तहसीलदार ठोंबरे यांच्याकडे अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघ फलटण शाखेचे तालुका अध्यक्ष अनिकेत तात्याबा पवार यांच्या समवेत राज्याचे तरुण तडफदार अध्यक्ष अनिल पवार, समाजाचे सल्लागार अनिल वणारे, धुळदेवचे युवा कार्यकर्ते लखन धुमाळ, अजय पवार, फलटणचे ओंकार साळुंके, अनिकेत मोरे, प्रेम भोसले, युवा नेते भैया पवार, घडशी समाजातील कलाकार योगेश धुमाळ, धुळदेवचे अध्यक्ष अण्णा पवार, संतोष पवार, कोळकीचे गणेश वाडेकर, फलटण शहर अध्यक्ष सिद्धू साळुंके, फलटण तालुका उपाध्यक्ष अशोक साळुंके,  दिपक पवार यांनी दिले.
Previous Post Next Post