इतर मागासवर्ग व वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक




स्थैर्य, मुंबई दि. 8 : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीस उपसमितीचे सदस्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, वन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपसमितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे उपस्थित होते.

Previous Post Next Post