कातरखटाव ला नंदी महादेवास दुधाचा अभिषेक करून आंदोलन


नंदी-महादेवास दुधाचा अभिषेक घालताना शेतकरी. (छाया : समीर तांबोळी)


स्थैर्य, कातरखटाव, दि. २१ : कोरोना महामारीमुळे  सर्वसामान्यांना  जिने अवघड होऊन बसले असताना शेतकऱयांच्या उत्पन्नाचे स्रोत असलेल्या दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून दुधाचे दर कमी झाल्याचे निषेधार्थ येथील  शेतक-यांनी  नंदी-महादेवास दुधाचा अभिषेक घालत गरीबांना दुध वाटप करत अनोखे आंदोलन केले.

यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले की, सध्या कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य जनतेला फार मोठे हाल सोसावे लागत आहेत.  पशुखादय, खत, डीझेल, अवजारांचे दर गगनाला भिडले आहेत मात्र ज्या दुधाला तीस रुपये दर मिळत होता तेच दुध आता अठरा ते एकोनीस रुपयांनी घालावे लागत आहे. आज सर्व महाराष्ट्रभर दुध खरेदी बंद आहे. मी नोकरी सोडून दहा गाई सांभाळत दुग्धव्ययसाय सुरु केला आहे. परंतू दुधाचे दर कोलमडल्याने आमचे कंबरडे मोडले आहे. शेतीसाठी व दुध व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्तेही भागत नाहीत. आज मोठया डे-यांनी बंद पाळुन दुध दराबाबत असलेले आंदोलन सुरु ठेवले आहे. दुधाची नासाडी न करता श्रावण महिण्यातील पहिला दिवस असल्याने नंदी-महादेवसा अभिषेक घालून हे दुध  गोरगरीबांना वाटले आहे.गाईच्या दुधास किमान पंचवीस रुपये दर देण्याची मागणी करत
लॉकडाउनच्या काळात प्रशानाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी अजय पाटील, योगेश बागल, शुभम बोडके, अमोल बागल, समीर डांगे, दस्तगीर डांगे, आझाद मुल्ला आदीसह शेतकरी  उपस्थित होते.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.