कु. नेहा मनीष इनामदार १००% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम
स्थैर्य, सातारा, दि. ३० : मार्च २०२० मध्येझालेल्याइयत्ता १०वीच्या शालांत परीक्षेमध्ये सातारा येथील न्यूइंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. नेहा मनीष इनामदारही १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम आली असून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये प्रथम येण्याचा मान कु. नेहा हीने संपादन केला आहे.

मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १७ लाख ५० हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी राज्यामधील २४२ विद्यार्थी १०० टक्के गुणांचे मानकरी ठरले आहेत.

कु. नेहाहीने शालेय अभ्यासा बरोबरच वक्तृत्व व नृत्य हे छंद जोपासले असून विभागीय व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये २० हून अधिक बक्षीसे मिळवली आहेत.  कु. नेहा हीगेली १० वर्षेभरतनाट्यम् चे शास्त्र शुध्द प्रशिक्षण घेत असून नुकतीच गांधर्व महाविद्यालयाची भरतनाट्यम विशारद प्रथम परीक्षा विशेष योग्य ते सहती उत्तीर्ण झाली आहे. इ. १० वीच्या परीक्षेसाठी कु. नेहा हीने कोणताही खासगी क्लास लावलेला नव्हता.

कु. नेहा हीची आई डॉ. शितल इनामदार व वडील डॉ. मनीष इनामदार हे साताऱ्यातील प्रतिथयश होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. १०वी नंतर पुढे वैद्यकीय क्षेत्रात जाऊन सर्जन होण्याची नेहाची इच्छा आहे. 

नेहाच्या या अभूतपूर्व यशामध्ये न्यू इंग्लिश स्कूल सातारा शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक शिवले सर यांचे बहुमोल मार्गदर्शनाचा महत्वाचा वाटा आहे. या यशाबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अमित कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक शिवलेसर, समर्थ एज्युकेशनल ट्रस्टचे चेअरमन अरविंद गवळी, सेक्रेटरी निशांत गवळी तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नेहाचे अभिनंदन केले  व तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post