मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
स्थैर्य, मुंबई, दि. २० : कोरोना व्हायरसच्या तडाख्यातून सामान्यांसह राज्याचे मंत्रीही वाचत नाहीयेत. कापड उद्योग आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबद्दल स्वतः शेख यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

अस्लम शेख यांना लागण झाल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या चौथ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती.

मात्र, या तिघांनीही मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. अस्लम शेख मात्र घरीच राहणार असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं नाही.
Previous Post Next Post