डोक्यात दगड घालून पत्नीचा खून
स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा तालुक्यातील उरमोडी नदीच्या पात्रालगत मानेवाडी येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली.  सौ. राधिका सचिन गुजर (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित सचिन भगवान गुजर (वय 38, रा. मानेवाडी) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, गुजर दाम्पत्य हे मानेवाडी गावात राहते. सोमवारी रात्री ते उरमोडी नदीपात्रालगत असलेल्या रानात गेले होते. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वादावादी झाली. वाद विकोपाला जावून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली व परिसरातील दगड पत्नीच्या डोक्यात घातला. या घटनेत सौ. राधिका गुजर गंभीर गंभीर जखमी झाल्या. मारहाणीवेळी महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही जणांनी त्याठिकणी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी महिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे, पोलीस उपनिरीक्षक, डी. पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता.

सचिन भगवान गुजर (40) हा मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येते. त्याचे घर गावाबाहेर असल्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणाची माहिती इतरांना माहिती पडली नाही. घरगुती वादातून हा खून घडल्याची शक्यता व्यक्त होत असून सातारा तालुका पोलीस शोध घेत आहेत.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.