ना. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस राष्ट्रवादी भवनमध्ये केक कापून साजरा
स्थैर्य, सातारा, दि. 29 : महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस राजकुमार पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा जयश्री पाटील, दत्ता उत्तेकर, सचिन बेलागडे, युवक प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे,विद्यार्थी अध्यक्ष अतुल शिंदे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवा दल मुख्य संघटक राजेंद्र लावंघरे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफीक शेख, भटके-विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, सीमा जाधव, उषा पाटील, डॉ. प्रसन्न बाबर, नलिनी जाधव, अक्षय शिंदे, इस्माईल सय्यद, बाबा सय्यद, भीमराव घाडगे, बाळासाहेब शिंदे,साधना, समीर शेख, पूजा काळे, निवास शिंदे, सुभाष यादव,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुनील माने म्हणाले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार व पणन मंत्री म्हणून केलेले कार्य हे अग्रणी असून महाराष्ट्रामध्ये त्यांनी  मंत्री म्हणून चांगले निर्णय घेतले आहेत. मागील 10 वर्षातील शासनाने केलेली सर्वात मोठी कापूस खरेदी तसेच सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांना चांगला दर दिला. त्यांचा महाराष्ट्रात सह्याद्री पॅटर्न हा सर्वांना परिचित झाला आहे. खा. शरद पवार यांनी त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये सदस्यपदी नियुक्ती केली. रयतमध्येही ते चांगले काम करतील असा विश्‍वास सुनील माने यांनी व्यक्त केला. प्रस्ताविक राजकुमार पाटील यांनी केले. आभार राजेंद्र लावंघरे यांनी मानले.
Previous Post Next Post