कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा 28 दिवसांसाठी जेलबाहेर
स्थैर्य, नागपूर, दि. ०८ : अडंरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. विशेष म्हणजे अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच नागपूर कारागृहात परतला होता. गवळीने फर्लो रजा मिळावी म्हणून 30 नोव्हेंबर 2019 ला तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता, परंतु त्याच्या अर्जावर 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही सुनावणी झाली नाही. त्याचबरोबर यापूर्वी 8 वेळा अरुण गवळी हा कारागृहातून बाहेर आला, परंतु दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही.

गवळीच्या वकिलांनी तो दिलेल्या कालावधीत तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद केला आहे. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद मान्य करीत गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे. अरुण गवळीचा पॅरोल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे वाढवण्यात आला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या खुनाच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
Previous Post Next Post