परफेक्सनीस्ट आमिर खानच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
स्थैर्य, मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता अभिनेता आमिर खान यांच्या स्टाफमधील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आमिर खानने स्वतः याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

आमिर खानने आपल्या इंस्टाग्राम नोटमध्ये माझ्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि कोरोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे खूप आभार मानतो.

उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या आईला कोरोना चाचणीसाठी घेऊन जात आहे. तिचाही रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे अशी प्रार्थना करा. त्वरित आणि काळजीपूर्वक उपाय केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन या रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. कोरोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.
Previous Post Next Post