फलटण अभियांत्रिकी महाविद्यालय विविध क्षेत्रात अग्रेसर


शिक्षण, संशोधन, व्यवसाय व प्रशासकीय कौशल्य विकास या मार्गावर फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांची चौफेर वाटचाल

स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण मध्ये उद्योग व सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जैवअभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ  संशोधकांचे सहकार्याने संशोधन करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.

अभियांत्रिकी महाविद्यालय' व 'सोसायटी फॉर कॅन्सर रिसर्च अँड कम्युनिकेशन मुंबई' यांच्या संयुक्त विद्यमाने "मेडिकल इमेजिंग 2020" या विषयावरती संमेलन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शुक्रवार दिनांक 24 जुलै 2020 रोजी सायंकाळी 8.30 वाजता सुरू होईल. गुगल मिट च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने हे संमेलन व चर्चासत्र होणार आहे. सुरुवातीला 'नानावटी हॉस्पिटल मुंबई' येथील मुख्य रेडिएशन ऑन्कॉलॉजीस्ट  डॉ. नागराज ह्युलगोल हे 'डिफॉर्मेबल इमेजिंग इन कंटेम्पररी रेडिएशन ऑन्कोलॉजी' या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर  जिनेवा, स्वित्झर्लंड येथील सुप्रसिद्ध न्युरो इमेजिंग तज्ञ डॉ. एन्रिको अमीको हे 'फंक्शनल इमेजिंग मधील नवनवीन घडामोडी' या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. ते "ॲम्बीजओनो इन्स्टिट्यूट ऑफ बायो इंजिनिअरिंग जिनेवा, स्वित्झरलँड" मध्ये मुख्य अन्वेषक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर 'डॉ. अरुण जामकर', माजी कुलगुरू," महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस" हे 'मेडिकल इमेजिंग मधील यशोगाथा' या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर 'मेडिकल इमेजिंग' या विषयावरती उपस्थितांमध्ये चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रामध्ये मेडिकल इमेजिंग या विषयावरील टेक्नॉलॉजी व संशोधनाची दिशा तसेच याबाबतचे महत्त्वाचे शोध, घडामोडींबाबत फलटण एज्युकेशन सोसायटीचे, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग फलटण चे प्राचार्य डॉ. अजय देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. हे संमेलन व चर्चासत्र 'सोसायटी फॉर कॅन्सर रिसर्च अँड कम्युनिकेशन' चे सर्व सदस्य, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

'केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र पुणे' यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग व कंप्यूटर इंजीनिअरिंग विभागातील ६० विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पावरती काम करण्याची संधी मिळाली आहे. अशा पद्धतीने शासकीय संशोधन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची व प्राध्यापक व विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्याची सुवर्णसंधी महाविद्यालयास उपलब्ध झालेली आहे.

इंडस्ट्री 4.0 च्या माध्यमातून विविध कंपण्यांना त्यांचे प्रश्न व विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन, कम्प्युटर इंजिनीअरिंगचा इंडस्ट्रीमध्ये नवीन सॉफ्टवेअर बनवने, इलेक्ट्रॉनिक्स व  टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये सेन्सर व रोबोटिक्स मधील संशोधन, सिव्हिल इंजीनिअरिंग विभागामार्फत वॉटर अँड लँड मॅनेजमेंट व स्मार्ट सिटी या विषयावर काम सुरू. उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांसोबत समन्वय साधत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार.

"करिमो टेक्नॉलॉजी" कंपणी  तसेच आय. आय. टी. पवई, इंडियन केमिकल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने १५० केमिकल कंपणीतील व्हाईस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर यांना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी इंडस्त्री 4.0 या विषयावरती मार्गदर्शन केले आहे.महाविद्यालयाने विद्यार्थी व प्राध्यापक यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केलेली आहेत व भविष्यामध्ये ही अत्यंत उच्च दर्जाची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सेंसर व उद्योग  या विषयावरही  महाविद्यालयाच्या वतीने चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रामध्ये ५० कंपणींतील जनरल मॅनेजर सहभागी झाले होते. या चर्चासत्राचा फायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्राध्यापक यांना झाला. या चर्चासत्रामध्ये लंडण येथील अभियंते व संशोधक तुषार अग्रवाल यांनी  रोबोटिक्स या विषयावरती आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणासाठी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका अशा विविध देशांतील संशोधक गुगल मिट च्या माध्यमातून उपस्थित होते.

बदलत्या काळाची दिशा ओळखून महाविद्यालयातुन  उद्योजक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक यांनी मार्गदर्शन केले आहे.कमीत कमी भांडवलामध्ये कशा पद्धतीने चांगल्या प्रतीचा व आपल्या क्षेत्रातील उद्योग उभारता येतो व उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींचा उहापोह या प्रशिक्षणादरम्यान करण्यात आला.

महाविद्यालयांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचे हेतुने डॉ. जयंत नारळीकर व डॉ. मंगलाताई नारळीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गोष्टीरुपात विज्ञान व गणित  मांडण्याची उभयतांचे कौशल्य सर्वांना ज्ञात आहेच त्याचा प्रत्ययच या व्याख्यानाच्या माध्यमातून आला. त्याचप्रमाणे "आर्यभटांचे गणित" या विषयावरील डॉ. एस. ए. कात्रे, लोकमान्य टिळक चेअर प्रोफेसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांची व्याख्यानमाला महाविद्यालयाने शाळांमधील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या साठी आयोजित केली आहे.

महाविद्यालयाची ही चौफेर घौडदौड सुरू असल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चौकशी वाढली आहे. अशा प्रकारचे अत्यंत चांगले उपक्रम राज्यातीलच नाही तर किंबहुना देशातील सर्वात चांगल्या महाविद्यालयांमध्येच होत असतात, त्यामुळे महाविद्यालयास एक वेगळी ओळख निर्माण होईल असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी काढले आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.