फलटणकरांनो, करोनाला लाईटली घेवू नका; करोनाचा तालुक्याचा आकडा 79 वर


स्थैर्य, फलटण : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली चिंताजनक गोष्ट म्हणजे 13 मधली काही लक्षणं नव्याने समोर आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. असे असताना फलटण मधील नागरिक संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विमानतळावर, पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर, माळजाई येथे व शहरासह लगतच्या उपनगरातील काही ठिकाणी जत्रा असल्यासारखे आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत जमत आहेत. काही जण फिरत आहेत. या मध्ये सुरक्षित अंतर ठेवून फिरण्याचा पूर्णतः फज्जा उडत आहे. या मध्ये बहुतांश युवक व व्यापारी वर्ग दिसून येत आहे. करोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असताना जर आपण शासनाने दिलेले निकष पाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण करोना या आजाराला लाईटली घेऊन चालणार नाही. करोनाची फलटण तालुक्यात काल (दि. 01 जुलै) रोजी करोना बाधित म्हणहेच ऍक्टिव्ह एकूण 26 रुग्ण असून आजखेर 47 रुग्ण फलटण तालुक्यातून बरे म्हणजेच करोनामुक्त झालेले आहेत तर करोनामुळे फलटण तालुक्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. असे एकूण 79 कोव्हीड व्यक्ती फलटण तालुक्यात आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

सध्या सगळीकडे मास्क अनिवार्य केला आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. पण लोकांनी मास्क वापरणं खरंच इतकं आवश्यक आहे का? नुकतंच जर्मनीने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीदरम्यान आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. भारतातही कोरोना व्हायरस संसर्गाचे हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, अशी आग्रही सूचना केली आहे.

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर अंतरावर उभं राहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. जे आजारी आहेत आणि ज्यांना संसर्गाची लक्षणं आहेत, त्यांनी चेहऱ्यावर मास्क बांधावेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. तोंडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून विषाणूची लागण होते, या आधारावर हे अंतर ठरवण्यात आलेलं आहे. बहुतांश ड्रॉपलेट हवेत विरून जातात किंवा संबंधित व्यक्तीच्या आसपास खाली जमिनीवर पडतात, असं आतापर्यंत मानलं जात होतं.

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून छोटी मात्र वेगवान अशी हवा बाहेर पडते. याला संशोधकांनी क्लाऊड ऑफ गॅस म्हटलं आहे. या क्लाऊड ऑफ गॅसमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे थेंब असू शकतात. यातले अतिसूक्ष्म थेंब दूरवर वाहून नेले जाऊ शकतात, असं या संशोधनात आढळून आलं आहे. प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हा प्रयोग करण्यात आला. यात असं आढळलं आहे की अशापद्धतीने पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब खोकलल्यानतंर 6 मीटर तर शिंकल्यानंतर 8 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात.  
Previous Post Next Post