फलटणच्या ब्लड बँकेत सध्या रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन


स्थैर्य, फलटण : फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील ब्लड बँकेत  सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, तरी फलटण शहर व तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी केले आहे. फलटण ब्लड बँकेत दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्त स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून आपल्या सोईनुसार वरील वेळेत येऊन रक्तदान करावे, अशी विनंती ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बिपीन शहा यांच्याशी 9850501980 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya