डोंबाळवाडीतील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सुमारे चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त


स्थैर्य, फलटण :  डोंबाळवाडी, ता. फलटण येथील लोणंद पोलीस स्टेशनच्या असणाऱ्या अवैधरीत्या तीन पानी जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेरा जुगारींवर कारवाई करून रोख रक्कमेसह सुमारे चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि .२४ रोजी सायंकाळी सव्वा चार वाजताचे सुमारास डोंबाळवाडी ता.फलटण गावचे हददीतील डोंबाळवाडी गावात जाणारे रोडचे डावे बाजुस मनोज नरसिंह पवार रा. सोमवार पेठ, फलटण यांचे शेतात विट भट्टी जवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तीन पानी जुगार चालत असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार लोणंद पोलिस स्टेशनचे सह्यायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला. सदरील छाप्यामध्ये एकूण तेरा जुगारींवर कारवाई करून रोख रक्कमेसह मोटारसायकल, मोबाईल फोन व चारचाकी असा एकूण चोवीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सदरील जुगार अड्ड्यावर तेरा जणांवर भादविसह १८८, २६ ९ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४, ५ अन्वये स्वताचे आर्थिक फायदयाकरीता बेकायदा, विगरपरवाना तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना जिल्हाधिकारी सातारा यांनी पारित केलेला कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन तोंडास मास्क न लावता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता हयगयीने एकत्र बसुन मानवी जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याच संभव असल्याने घातक कृती करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केलेले मिळुन आल्याने गुन्हा दाखल केला आहे. 

या कारवाईत सह्यायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र पाडवी, ज्ञानेश्वर मुळीक, मल्हारी भिसे, फैयाज शेख, श्रीनाथ कदम, अविनाश शिंदे, केतन लालगे, संतोष इंगवले, ओमकार कोळी, भिकू येळे, जयदीप भोईटे यांनी भाग घेतला.
Previous Post Next Post