सार्वजनिक ग्रंथालयांनी 31 जुलै पर्यंत वार्षिक अहवाल सादर करावेत
स्थैर्य, सातारा दि. 10 : शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयाने मागील आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल 30 जून पर्यंत जिल्हा ग्रंथालय अ धिकारी कार्यालयाकउे सादर करणे आवश्यक आहे. तथापि, सद्य:स्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे काही क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. ही बाब विचारात घेवून शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांनी केवळ सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल दि. 31 जुलै 2020 पर्यंत सादर करावेत. तसेच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी  वार्षिक अहवालासोबत सार्वजनिक न्यास  संस्थेने ग्रंथालयाच्या विद्यमान कार्यकारी मंडळास मंजुरी दिलेल्या आदेशाची साक्षांकित छायाप्रत जोडावी असे आवाहन जिल्हा गंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केले आहे.

दिलेल्या मुदतीत अहवाल या कार्यालया प्राप्त न झाल्यास परिरक्षण अनुदान आहरित करण्यात येणार नाही व त्याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयाचे राहील,असेही श्री. सोनवणे यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post