नागाचे कुमठे येथील बेकायदेशीर दारु अड्डयावर छापा; दोघांवर गुन्हा दाखल
स्थैर्य, औंध, दि. २५ : नागाचे कुमठे ता.खटाव येथे दोन ठिकाणी बेकायदेशीरपणे दारु विकणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून दोन जणांविरुद्ध औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून  सुमारे चार हजाराच्या दारुच्या बाटल्या औंध पोलीसांनी जप्त केल्या. 

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, आनंदा महादेव फडतरेवय 63, सोपान 
यशवंत पवार वय 40हे दोघे नागाचे कुमठे येथे आपल्या घरांंच्या आडोशाला बेकायदेशीरपणे दारु विकत असल्याची माहिती औंध पोलीसांना मिळाली .त्याठिकाणी सपोनि उत्तम भापकर, पोलीस हवालदार  प्रशांत पाटील,कुंडलिक कटरे, होमगार्ड खैरमोडे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आनंदा फडतरे याच्याकडून दोन हजार आठशे रुपये किंमतीच्या वीस  विदेशी  दारुच्या  बाटल्या  जप्त केल्या तर सोपान पवार याच्या कडून एक हजार चाळीस रुपये किंमतीच्या देशी दारुच्या सुमारे वीस बाटल्या जप्त केल्या. 

सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. आनंदा फडतरे व सोपान पवार यांच्यावर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक तपास सपोनि उत्तम भापकर, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे,सुभाष डुबल करीत आहेत.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.