पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी करा : सचिन सूर्यवंशी - बेडके


स्थैर्य, फलटण : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातीलअसलेल्या सर्व पदवीधर व शिक्षक बांधवांनी व बहिणींनी लवकरात लवकर नोंदणी करावी. सध्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला असून सदरील कार्यक्रम हा पूर्णपणे ऑनलाइन आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी आपली नोंदणी पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी करावी असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सूर्यवंशी बेडके यांनी केलेले आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याकरता http://sachinsuryawanshibedke.in/ या वेबसाईटद्वारे नोंदणी करावी असे आवाहनही नगरसेवक सचिन सूर्यवंशी बेडके यांनी केलेले आहे.

आगामी काही महिन्यांमध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित होणार असून त्यासाठी प्रत्येक पदवीधरांनी व प्रत्येक शिक्षकांनी आपली नोंदणी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करावी. आपल्या पुणे मतदारसंघातून उमेदवार निवडून देताना आपण चांगल्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर व शिक्षक बंधू-भगिनींनी आपली नोंदणी करावी असेही नगरसेवक सचिन सूर्यवंशी बेडके यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post