ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरास प्रतिसाद


ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख अनिल कदम


स्थैर्य, कातर खटाव, दि. ०९ : खटाव तालुक्यातील ललगुण, राजापूर, कळंबी या तीन केंद्रातील प्राथमिक शिक्षकांना झुम अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबीरास शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी दिली.

याबाबत माहिती सांगताना श्री. कदम यांनी सांगितले की, कोरोना समस्येने शाळा बंद आहेत पण शिक्षण चालु आहे.यासाठी शासन व शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटक कार्यरथ आहेत.

ऑनलाईन एज्युकेशन व ई-लर्निग,लर्निंग फ्रॉम होम म्हणजे बदलत्या काळानुसार नवीतंत्र व नविन विचार, संकल्पना समजुन घेऊन आत्मसात केले पाहिजेत. कोरोनाचे पार्श्वभुमिवर शिक्षण क्षेत्रातही बदल घडत आहेत. सुरक्षित आरोग्यसंपन्न राहुन शिक्षण चालु ठेवण्याचे मोठे आव्हाण शिक्षणव्यवस्थेसमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकाबरोबर पालकांचीही चांगली कसोटी लागणार आहे. यावेळी फलटण येथील अधिव्याख्याता किरण शिंदे यांनी शिक्षकांना शासनाच्या दिक्षा अ‍ॅपबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी गणपत बनसोडे, विश्वास चौधरी, तुकाराम कुंभार, अरुण जवळे आदी शिक्षकांनी शंका, समाधान कार्यक्रमात सहभाग घेतला. तर प्रशिक्षण शिबीरात 75 शाळांतील सुमारे 174 शिक्षक सहभागी झाले होते. शिबीराच्या यशस्वी नियोजनाबद्दल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकार्‍यांनी श्री. कदम व संयोजकांचे कौतुक केले.
Previous Post Next Post