साधना इंग्लिश मीडियमचा निकाल 100 टक्के
स्थैर्य, सातारा, दि. ३० : येथील यशोदा शिक्षण संस्था, सातारा संचलित साधना इंग्लिश मीडियमचा निकाल 100 टक्के लागला असून आदिती दत्तप्रसाद घाडगे  99 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. इतर सर्व विद्यार्थी 80 टक्के व 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

साधना मराठी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून कनिष्का खटावकर  हिने 93 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  या संस्थेने ग्रामीण भागात  गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, नुने, ता.पाटण या शाळेचा निकाल 95 टक्के लागला असून माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, राधिकानगर, सातारा या विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.  या सर्व यशामध्ये सर्व शिक्षक वृंदाचा मोलाचा वाटा आहे. यासाठी मुख्याध्यापिका सौ. वनिता जाधव, सौ. वैशाली धुमाळे, मुख्याध्यापक  संजय कदम,  चरणीकांत भोसले या सर्वांनी प्रयत्न करून हे यश मिळविले आहे. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी अभिनंदन केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संस्थेच्या इतर शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे : साधना इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून आदिती घाडगे हिने 99 टक्के गुण मिळवत प्रथम, वेदांत जंगम याने 97.40 टक्के गुण मिळवत व्दितीय तर  साईराज मोरे  याने 96.20 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

साधना माध्यमिक विद्यालय, सातारा विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून  कनिष्का खटावकर हिने 93 टक्के गुण मिळवत  प्रथम, प्रणव साबळे याने 92.80 टक्के गुण मिळवत व्दितीय, श्रावणी वेदपाठक  हिने 91.80 टक्के गुण मिळवत तृतीय व गायत्री सोनावणे  हिनेही 91.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, राधिकानगर, सातारा विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून  सारिका गायकवाड हिने 75.80 टक्के गुण मिळवत प्रथम, पल्लवी महाडिक हिने 74.20 टक्के गुण मिळवत व्दितीय तर मानसी कांबळे हिने 60.00 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. न्यू इंग्लिश स्कूल नुने, ता. पाटण, जि. सातारा विद्यालयाचा निकाल 95 टक्के लागला असून प्रतीक्षा यादव हिने 88.40 टक्के गुण मिळवत प्रथम, शीतल बाबर हिने 87.40 टक्के गुण मिळवत द्वितीय तर सायली घाडगे हिने 86.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
Previous Post Next Post