सस्तेवाडी सरपंचपदी राधिका जाधव यांची बिनविरोध निवड


स्थैर्य, फलटण : सस्तेवाडी ता. फलटण गावच्या नूतन सरपंचपदी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या  नेतृत्वाखाली व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सस्तेवाडी गावात प्रथमच रामोशी समाजाला सरपंचपद देऊन समाजाचा बहुमान केला गेला त्या बद्दल समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजे गटाचे विशेष आभार या वेळी मानण्यात आले. 

सौ. राधिका दादा जाधव यांची सस्तेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सतीश आप्पा सस्ते, फलटण पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब ठोंबरे, सुदामराव कदम, संजय कदम, सुनील वाबळे, दादा चव्हाण, तानाजी धुमाळ, संजय जाधव, सुरेश पखाले, विजय सस्ते, बापूराव शिरतोडे, सागर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 
Previous Post Next Post