सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.२५ टक्के

 


स्थैर्य, सातारा, दि. २९ : मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.२५ टक्के लागला आहे. मागील वर्षी पेक्षा यंदाच्या निकालात अकरा टक्के वाढ झाली आहे. निकाल आज दुपारी जाहीर झाला. पालक आणि विद्यार्थी यांनी इंटरनेटच्या माध्यमातून निकाल पाहिला.

सातारा जिल्हयातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची इयत्ता दहावी परीक्षा केंद्रे ११६ होती. कोल्हापूर जिल्हयाचा निकाल ९८.२१ टक्के, सातारा ९७.२५ टक्के, तर सांगली ९७.२२ टक्के असा आहे. इयत्ता बारावी परीक्षेप्रमाणे दहावीतही सातारा जिल्हा दुसर्‍या स्थानी आहे. सातारा जिल्हयातील माहे फेब्रुवारी- मार्च-२०१९ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीचा निकाल परीक्षेचा सातारा जिल्हयाचा निकाल ८६.२३ टकके असा होता.यावर्षी जिल्हयातील परीक्षेसाठी विदयार्थी प्रविष्ठ संख्या-३९७८४ होती. त्यापैकी उत्तीर्ण संख्या- ३८६८८ अशी आहे सातारा जिल्हयाचा निकाल ९७.२५ टक्के आहे. सातारा जिल्हयातील एकूण विदयार्थ्यापैकी उत्तीर्ण मुलांची संख्या-२०३२३ (९६.२४ टक्के) तर मुलींची संख्या- १८३६५ (९८.३८ टक्के) अशी आहे.

सातारा जिल्हयातील विशेष प्राविण्य मिळविलेले उत्तीर्ण विदयार्थी संख्या-१७०१५, तसेच
श्रेणी-एक मधील विदयार्थी संख्या-१३५४३, श्रेणी-दोन मधील विदयार्थी संख्या-६८२८, उत्तीर्ण
विदयार्थी संख्या-१३०२ अशी आहे.
Previous Post Next Post