शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही? राऊतांचा सवाल




स्थैर्य, मुंबई, दि. २३ : राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान होत असताना भाजप आणि संभाजी भिडे यांची तोंड अद्याप बंद का? असा सवालशिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी समज दिली होती. सभागृहात कोणत्याही घोषणा करायच्या नसतात. तुमचं हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात येत असून यापुढे अशी विधाने सभागृहात करू नका, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, असा टोला लगावतानाच संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणाही नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी भाजपवर टीका करतानाच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनाही याप्रकरणात धारेवर धरले आहे. तर लॉकडाऊनमुळे सांगली, सातारा आधीच बंद आहे, हे राऊत यांना माहीतही नाही का? असा सवाल करत शिवप्रतिष्ठानने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आम्ही उदयनराजेंसाठी आंदोलने केली आहेत. उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही कायम आहोत, असंही प्रतिष्ठानने म्हटलं आहे.

दरम्यान, उदयनराजे यांचा भाजपने अपमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने अभिनव आंदोलन हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' असं लिहिलेली २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा केली होती. त्यास नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्याचा निषेध म्हणून ही पत्रे पाठवली जाणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.