फलटणच्या शिवानीचा सर्व विषयात ३५ गुण मिळवून विक्रम


स्थैर्य, फलटण : येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या कु. शिवानी महादेव तांदळे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयांमध्ये 35 गुण मिळवून एक वेगळ्या प्रकारचा विक्रमच रचलेला आहे. सदरील विद्यार्थिनी रविवार पेठ येथील मच्छी मार्केट येथे राहात आहे. कु. शिवानीच्या वडिलांचा चिकनचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. तर तिचा मोठा भाऊ आपल्या वडिलांना व्यवसायामध्ये मदत करीत असतो. आगामी शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळावे याबाबत शिवानीचे आता प्रयत्न चालू झालेले आहेत व आगामी काळात शिवानी नक्कीच वेगळे पण जपत शिक्षण करेल यात कोणतीही शंका नाही असेही तिचे मित्र परिवार म्हणत आहेत.

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या कु. शिवानी महादेव तांदळे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये रचलेल्या विक्रमाबद्दल अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, कार्यवाह रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, रवींद्र बर्गे, ज्येष्ठ सदस्य प्राचार्य शांताराम आवटे, प्रशासन अधिकारी व्यंकटेश देशपांडे, शाळेच्या चेअरमन सौ. अलका बेडकिहाळ व संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य कानिफनाथ ननावरे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांचेही अभिनंदन संस्थेच्या वतीने या वेळी करण्यात आले.

.....अन हा पठ्या जादा मार्क पडून हुकला

येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात शिकणाऱ्या कु. शिवानी तांदळे हिने सर्व विषयात ३५ गुण पटकावून एका आगळावेगळा उपक्रम रचला. परंतु त्याच विद्यालयातील विजय खोमणे या विद्यार्थाने विज्ञान या विषयात जादा मार्क पडून विक्रम रचण्यासाठी हा पाठ्या हुकला. कु. शिवनीच्या विक्रमाबाबत सर्व स्तरातून अभिनंदन होत असून ह्या पठ्याने ३५ गुण सर्व विषयात मिळवले परंतु एका विषयात ४१ गुण मिळाल्याने वेगळा विक्रम रचण्याची संधी मात्र विक्रमची हुकली. विजय खोमणेचेही कौतुक सर्व स्तरातून होत आहे. एरवी जादा मार्क मिळवून बरेच जण इतिहास रचत असतात परंतु ३५ % गुण मिळवण्याच्या विक्रमाबाबत फलटणच्या शिवानीने बाजी मारली परंतु सर्व विषयात ३५ गुण मिळून एकाच विषयात ४१ मार्क मिळाल्याने विजय खोमणे यास वेगळा विक्रम रचण्यात यश आले नाही. 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.