श्रावण महिन्याची सुरुवात वृक्षारोपणाने
केळवली येथील तरूणांचा स्तुत्य उपक्रम; स्वखर्चातून केली 300 रोपांची लागवड


स्थैर्य, मेढा, दि. २४ :  करोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असून मुंबई  लॉकडाऊन झाल्यापासून परळी खोऱ्यातील हजारो चाकरनामे पुन्हा आपल्या मायभूमीत परतले आहेत. निसर्गाची होणारी झीज तसेच रस्त्यालगत होणाऱ्या तर त्यांची पडझड रोखण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला वृक्ष लागवड केली विशेष म्हणजे तरुणांनी गटारीला होणाऱ्या वायफळ खर्च न करता त्या खर्चातून नर्सरी मधुन झाडे विकत घेऊन वृक्ष लागवड केली तसेच गावाला जाणार्‍या गाडी रस्त्यावर पावसाळ्यामुळे पडलेल्या तरीदेखील हटवण्यात आल्या. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला स्वखर्चातून तीनशे रोपे आणून शिवारात लागवड केली या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे या ओळींना साजेसे असे कार्य येथील तरुणांनी केले आहे.  केळवली पुनर्वसन गावातील तरुणांनी कडूलिंब, पिंपळ, वड, चिंच, जांभूळ, फणस, आंबा, निलगिरी, बांबू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी रोपे सुमारे तीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
Previous Post Next Post