श्री पाणलिंग विद्यालयाचे एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवित यश

 


स्थैर्य, वावरहिरे, दि. २९ (अनिल अवघडे) : मार्च  2020 घेण्यात आलेल्या माध्यमिक  शालांत  प्रमाणपञ परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या वावरहिरे शाखेने घवघवित यश संपादन केले.शाळेचा शेकडा निकाल97.46%लागला. चि.विवेक हणमंतराव अवघडे 94.80% गुण प्राप्त करुन  शाळेतुन प्रथम क्रमांक  तर कु.जाधव अस्मिता सुदाम 89.40दुसरा क्रमांक तर तृतीय क्रमांक कु बल्लाळ अमृता महादेव 88.40  प्राप्त केला .या सर्वाचे तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी  विद्यार्थ्थाचे  वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत वाघ,ग्रा पं सदस्य संदिप अवघडे, शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर,पर्यवेक्षक सौ वलेकर  मॅडम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे, सर्व शिक्षकवर्ग,पालक व ग्रामस्थ यांनी  अभिनंदन केले व पुढील उच्च शिक्षणास शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post