सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, फलटणचा निकाल ९१. १२%


स्थैर्य, फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम, फलटण या विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कोल्हापूर विभागा अंतर्गत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१. १२% लागला आहे. विद्यालयात कु.शिंदे रोशनी भानुदास ९२.४०, कु. कर्चे आरती बाळासो ९०.२०, कु.शिंदे कोमल रामदास ९०.०० गुण मिळवून यशस्वी झाल्या आहेत. 

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे श्रीराम एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव सचिन भैय्या सूर्यवंशी(बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्रभैय्या सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष मोदी, नियामक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या प्राचार्या सौ. काटे मॅडम, पर्यवेक्षिका सौ.रायते मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post