राजगृहाची नासधुस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी


म्हसवड पोलीस स्टेशनला निवेदन देताना भिमसैनिक.


स्थैर्य, म्हसवड दि. ९ : मंगळवारी मुंबई दादर येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या राजगृहावर अज्ञात जातीवादी हल्लेखोराने नासधुस केली त्या घटनेचा निषेध म्हसवड येथे करण्यात येवुन याचा पारदर्शकपणे पोलीसांनी तपास करुन हल्लेखोरांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी म्हसवड येथील आंबेडकरी, व भिमप्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन म्हसवड पोलीस स्टेशनला माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डोंबे, शिवदास सरतापे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.

येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बैठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला तर यामागे असलेल्या जातीवादी हल्लेखोरांवर कडक कारवाई करुन याचा तपास राज्याचे गृहमंत्री व पोलिस प्रशासनाने तात्काळ करावा अन्यथा डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व तमाम बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या  घटनेस पोलिस प्रशासन व गृहमंत्री जबाबदार राहतील असे मत माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, लक्ष्मण सरतापे, शिवदास सरतापे, बाळू सरतापे, खंडेराव सावंत, गणपत फुटाणकर, योगेश सरतापे, विकास सरतापे, हिंदूराव सरतापे, विठ्ठल सरतापे, राहुल सरतापे, दादा सरतापे, रणजित सरतापे, किरण सरतापे, अरुण सरतापे आदी मोजक्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून समाज मंदिरात बैठक घेण्यात आली.

याबाबतचे निवेदन म्हसवड पोलिस स्टेशनला सपोनि गणेश वाघमोडे यांना देण्यात आले या दिलेल्या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगराध्यक्ष  नितिन दोशी, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, शिवदास सरतापे, लक्ष्मण सरतापे, बाळू सरतापे, सामाजिक कार्यकर्ता राजकुमार डोंबे, शंकर पानसांडे, खंडेराव सावंत, सिध्देश्वर डांगे आदींच्या सह्या आहेत. 
Previous Post Next Post