आईला मारहाणीतून सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाच्या हातावर वार
स्थैर्य, सातारा, दि. 27 : येथील सोमवार पेठेत आईस मारहाण करणार्‍या दोघांना रोखण्यासाठी गेलेल्या मुलाच्या हातावर एकाने तीक्ष्ण शस्त्राने जखम केल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित महिलेच्या घराशेजारी त्यांचे नातेवाईक हणमंत तुकाराम देशमाने राहतात. त्यांचा मुलगा अभय हणमंत देशमाने हा रिमा लाड यांच्यासमवेत पाच वर्षापासुन एकत्र राहण्यास होते. 2 महिन्यांपुर्वी दोघे विभक्त झाल्यानंतर अभय देशमाने हणमंत देशमाने यांच्याकडे राहू लागला होता. दरम्यान, दि.26 रोजी रात्री 9च्या सुमारास रिमा लाड व रोहन चव्हाण हे दोघे फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले. फिर्यादीच्या घरच्यांना व शेजारील नातेवाईकांना शिवीगाळ करू लागले. यावेळी फिर्यादीने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिमा लाड व रोहन चव्हाण यांनी फिर्यादीसच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी महिलेचा मुलगा आर्यनमध्ये आला. त्यावेळी रिमा लाडने ओढणीमधुन काहीतरी लपवुन आणले होते. ते काढुन रोहन चव्हाणच्या हातात दिले. त्या धारदार वस्तुच्या साहय्याने रोहन चव्हाण याने आर्यनच्या हातावर मारले. त्यामुळे त्याच्या हातातुन रक्त येवु लागले व ते दोघे तेथुन पळुन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Previous Post Next Post