आरोग्य विभागाच्या प्रमुखपदावर आता सुहास पवार
स्थैर्य, सातारा, दि. २१ : सव्वा दोन लाख लाचेच्या प्रकरणात सगळा आरोग्य विभाग कामाला लागला होता. करोनाच्या काळात आरोग्य विभागाचे काम थांबू नये म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दोन जणांकडे पदभार आरोग्य निरीक्षक म्हणून तर विभागप्रमुख म्हणून अतुल दिसले यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार दिला होता. मात्र, पालिकेत मोठय़ा वजनाच्या कर्मचाऱ्यांची भलतीच चलती असते. ज्यांचे थेट संबध त्यांना चांगला टेबल असे गणित असते. नेमका  तोच प्रत्यय आला. नियम डावलून रेटून कामे करण्यासाठी परिचित असणारे सुहास पवार यांच्याकडे आरोग्य विभागाच्या प्रमुख पदाचा पदभार दिला गेला आहे. ते स्थावरला होते अजून ही आहेत. त्यांनी मदतीला स्थावरला लेखा विभागातून डोंबे यांना घेतले आहे.

यामुळे या बदल्यात वशिलेबाजी झाल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा पालिकेत आरोग्य विभाग लाच प्रकरणात सापडला होता. त्यावेळी जेवढे आरोग्य निरीक्षक होते ते सारेच निलंबित झाले. त्यांचा पदभार त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहर विकास विभागाचे सतीश साखरे आणि अतिक्रमण हटाव विभागाचे आस्टेकर यांच्याकडे सोपवला गेला आहे. साखरे हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याची चर्चा लगेच त्यावेळी सुरू झाली होती. पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख पद हे दिसले यांच्याकडे होते.

दिसले यांना दोन्ही ठिकाणाचा कारभार करताना तारेवरची कसरत व्हायची. पालिकेत आज सकाळीच दोन जणांच्या बदल्या झाल्याची चर्चा सुरू होती. त्यातले स्थावरचे सुहास पवार यांच्याकडे आरोग्य विभागाचा कारभार सोपवला गेला. पवार हे ही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याने आणि त्यांनी आजपर्यंत चांगल्या मलिद्याच्या टेबलावर कामे केली आहेत. तसेच पालिकेची गोपनीय माहिती सामजिक कार्यकर्त्यांना पुरवून आपला डाव साधवून घेणारे म्हणून नाव लौकिक आहे. नेमकी त्यांची बदली कशी आरोग्य विभागात केली अशी चर्चा पालिकेत रंगत होती. दरम्यान, पालिकेच्या लेखा विभागातील अक्टिव्ह कर्मचारी डोंबे यांना स्थावरला कसे सहाय्यक घेतले, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.