उंब्रजातील बेपत्ता युवकाची आत्महत्त्या


स्थैर्य, कराड, दि. २५ : ११ दिवसांपूर्वी गायब झालेल्या येथील ४० वर्षीय युवकाचा मृतदेह आज गळफास घेतलेल्या स्थितीत ओढ्याच्या पात्रातील करंजीच्या झाडाला आढळून आला.संबधित युवकाला एका वर्षांपूर्वी पँरालेसिसचा अँटक आला होता.त्यामुळे कामधंदा होत नसल्यामुळे तो मानसिक तणावात होता.त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे. मयत युवकाचे नाव राजेंद्र दामु आटोळे ४० रा.गोसावीगल्ली उंब्रज ता.कराड असे आहे.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी,फिर्यादी तुकाराम दामु आटोळे ३७ रा.गोसावीगल्ली उंब्रज ता.कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,राजेंद्र आटोळे याला एका वर्षांपूर्वी पँरालेसिसचा अँटक आला होता.त्यामुळे कामधंदा होत नसल्यामुळे तो मानसिक तणावात होता.काही दिवसांपूर्वी त्याने घरात पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरीही आणून ठेवली होती.दिनांक १४ जुलै रोजी राजेंद्र घरात न सांगता निघून गेला.तो परत आला नाही. म्हणून घरातल्या सर्वानी त्याचा शोध घेतला.परंतु तो कोठे मिळून आला नाही.यानंतर १६ जुलै रोजी राजेंद्रच्या पत्नीने राजेंद्र बेपत्ता झालेली तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.यानंतर आज उंब्रज गावच्या हद्दीतील लीमणीचे तुकडे नावाच्या शिवारातील ओढ्याच्या काठावरील करंजाच्या झाडास पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावुन घेतलेला राजेंद्रचा मृतदेह आढळून आला.या तक्रारी वरून उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार युवराज पवार करत आहेत.
Previous Post Next Post