पुसेगाव उपसरपंचपदी सुरेखा केशव जाधव बिनविरोध
स्थैर्य, पुसेगाव, दि. ०८ : पुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सुरेखा केशव जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे, श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या धोरणानुसार रिक्त झालेल्या उपसरपंच जागेवर ही निवड करण्यात आली.

सरपंच सौ मनिषा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी सौ  सुरेखा जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी व्ही. आर. तोरडमल यांनी सुरेखा जाधव यांची  बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेस ग्रामपंचायत सदस्य, विश्वस्त रणधीर जाधव, सुनीलशेठ जाधव, प्रकाश जाधव, चंद्रकांत जाधव, रोहन देशमुख, वैभव भोसले, अनिल बोडके, सौ मंगल जाधव, सौ दीपाली मुळे, सीमा जाधव, शोभा मसणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनशक्ती संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व माजी सरपंच ॲड. श्रीकृष्ण जाधव,माजी प्राचार्य ए, डी, जाधव,अंकुशराव पाटील,संदीप जाधव,भरत मुळे,विक्रम जाधव,महादेव जाधव, जे .टी. जाधव, दादा गोरे, घनश्याम मसणे, यशवंत चव्हाण, अविनाश रणशिंग, सागर नलवडे, ग्रामसेवक एन. एम. नाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.