जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा दहावी निकाल : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे
स्थैर्य, लातूर, दि. २९ (राहुल शिवणे) : दहावीच्या परीक्षेतील यशाने लातूरची गुणवत्ता पुन्हा एकदा झळाळली असून १००% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भर घालणारा निकाल राज्याला पथदर्शक असल्याची प्रतिक्रिया लातूर जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांनी व्यक्त केली.दहावीच्या परीक्षेत लातूर बोर्डाने मिळविलेले यश अभिनंदनीय असल्याचे केंद्रे म्हणाले.

राज्यात १००% गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांमध्ये  ६२% विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत हा गौरवाचा विषय आहे.

लातूर जिल्ह्याचा निकाल 96.51% असून
राज्यात १००% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या 242 ,पैकी 151 विद्यार्थी लातूर विभागातील असून यापैकी 129 विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहेत. तसेच अनेक शाळांचे निकाल ९०% पेक्षा जास्त आहेत. निकालाची टक्केवारी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असून यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक, अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे यात योगदान आहे असे  जि. प. अध्यक्ष राहूलजी केंद्रे म्हणाले.  जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिनव गोयल,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती भारतबाई साळूंके, कृषी सभापती गोविंदराव  चिलकुरे, महिला व बालविकास सभापती ज्योतीताई  राठोड, बांधकाम सभापती संगीताताई  घुले, समाजकल्याण सभापती  रोहिदास  वाघमारे, ,शिक्षणाधिकारी माध्य. यांनी जि,प,च्या वतीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post